पारमी फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

अकोला, दि. ८ : माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पारमी मल्टीपर्पज फाउंडेशन, अकोला यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान येथे आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कॅन्सर आणि स्त्रियांच्या आरोग्य समस्या याविषयी प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अमित बगडिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील त्यागाला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पारमी फाउंडेशनच्या अध्यक्षा मंदाताई तेलगोटे, वेणुताई डोंगरे, संगीता गवई, कीर्ती गवई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात अनुजा अंभोरे या चिमुकल्या बालिकेने माता रमाईंच्या संघर्षमय जीवनावर मनोगत व्यक्त केले. तसेच कुसुम पातोडे यांनी “रामू चांदाची आहे तू ग चांदणी” हे रमाई गीत सादर केले, तर मां अनुसया नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी सोनिका अंभोरे यांनी “येणारं बाई बॅरिस्टर साहेब माझं” या गीताने उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा खाडे, स्वाती कांबळे, अनुराधा डोंगरे, अमृता गवई, अलका वाघ, रीना प्रधान, वैशाली सोनोने, अलका डोंगरे, संध्या वानखडे, छाया सुरडकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच महिला मंडळ व मां अनुसया नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुनम तेलगोटे यांनी केले.