माणिक गवई चा रोखठोक सवाल… गरजूंना राशन कार्ड कधी द्याल..

माणिक गवई लिखित व दिग्दर्शित राशन ही शॉर्ट फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून रेशन कार्ड धारकांना अत्यंत अल्प दरात धान्य वाटप केले जाते. यांत्रिकीकरणामुळे आता रेशनच्या दुकानात इ पॉज यंत्र ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त कोणालाच धान्य मिळत नाही म्हणजेच ज्यांना राशन कार्ड आहे. त्यांनाच राशन मिळते पण ज्यांना राशन कार्डच नाही असे गरजू आणि पाल ठोकून राहणारे एका गावातून दुसऱ्या गावात भटकंती करणारे कुटुंब शासनाच्या अशा योजनेपासून वंचित राहत असल्याने एकीकडे गरीबीमुळे उपासमार होत आहे. तर दुसरीकडे सरकारी योजनेचा गैरफायदा होत आहे. या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शक माणिक गवई यांनी आपल्या राशन या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून केला आहे .आपल्या अभिनयाच्या जोरावर कचरा वेचणाऱ्या आईची भूमिका वैष्णवी डावरे यांनी उत्कृष्टपणे साकारली असून स्वराज वानखडे यांनी तितक्याच ताकतीने मुलाची भूमिका पार पाडली आहे.

हृदयाला स्पर्श करणाऱ्या या शॉर्ट फिल्मची निर्मिती वैभव गुल्हाने यांनी केली असून किशोर भगत धीरज जैस्वाल उमेश इंगळे यांच्यासह देवानंद वानखडे हे विशेष भूमिकेत असून निलेश वानखेडे यांनी या शॉर्ट फिल्मचे छायाचित्र केले आहे.रवी नवालकर ,कृष्ण गोपाल वानखडे, प्रफुल टाक, अब्दुल बाकी यांची विशेष सहकार्य लाभले .तर ही शॉर्ट फिल्म एक वेळ अवश्य पहावी असे आवाहन लेखक दिग्दर्शक माणिक गवई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.