
अकोला: पोलीस स्टेशन माना हद्दीत आरोपी कडून 141 किलो ग्रॅम गांजासह 53,66,600/-रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पो.स्टे माना परिसरात पोलीस पट्रोलिंग करत असतांना, माना फाटया जवळ अमरावती कडुन मुर्तिजापुरकडे जाणा-या एन एच 53 रोडवर टाटा कंपनीचा 10 टायर ट्रक क्रमांक डब्लु बी 23 डी 7237 हायवेच्या कडेला उभा दिसला. ट्रकच्या बाजुला एक इसम संशयास्पदरित्या उभा दिसला. त्याच्या बाजुला जमिनीवर पिवळ्या रंगाच्या भरलेल्या 04 पोते दिसुन आले. पोलीसांनी इसमाजवळ जावुन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पिंटु कृष्णा दास (रा कलकत्ता) असे सांगितले. पोलीसांना पोत्यांमध्ये गांजा असल्याचा संशय आल्याने लागलीच, एनडीपीएस कायदयातील तरतुदीचा अवलंब करून आरोपी पिंटु कृष्णा दास याचे ताब्यातुन चार गोण्या मधील एकुण 141 कि.ग्रॅ.330 ग्रॅम गांजा, प्रति किलो 20,000 रू प्रमाणे एकुण किंमत 28,26,600/- रू चा गांजा जप्त केला. तसेच आरोपी कडे असलेला व्हिओ कंपनीचा मोबाईल किं. 40,000/-रू, गुन्हयात वापरलेला ट्रक क्रमांक डब्ल्यु बी 23 डी 7237 किमंत 25,00,000/-रू. असा एकुण 53,66,600/-रु. चा मुद्देमाल गुन्हयात जप्त केला .
कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि सुरज सुरोशे, ठाणेदार पो.स्टे माना, पोउपनि गणेश महाजन, पोहेकॉ उमेश हरमकर , पोकों पंकज वाघमारे पोकॉ नंदकिशोर हिरुळकर, जयकुमार मंडावरे यांनी केली.