अकोला | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या संघटन बांधणीचा भाग म्हणून प्रभाग क्रमांक २ मध्ये दिनांक १६ जुलै २०२५ रोजी आयोजित बुथ समितीची बैठक अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडली. अकोट फैल येथील शंकर नगर येथे भरलेल्या या बैठकीला महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.
या बैठकीचे अध्यक्षस्थान अकोला महानगर अध्यक्ष सौ. वंदनाताई वासनिक यांनी भूषवले, तर प्रमुख मार्गदर्शन प्रभाग समिती प्रमुख सौ. योगिताताई मनोज वंजारी यांचे लाभले.
महानगर पदाधिकारींपैकी महासचिव ज्योतीताई खिल्लारे, उपाध्यक्ष मायाताई इंगळे, मंदाताई शिरसाठ, सरोज ताई वाकोडे, सुनिता ताई गजघाटे यांनीही संघटनात्मक दिशा देणारे विचार मांडले.
प्रभाग २ मधील महिलांची प्रभावी उपस्थिती ही यावेळी लक्षणीय ठरली.
उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये –
हर्षाताई मेश्राम, शालू ताई वंजारी, प्रभाताई कानगुडे, शिल्पा ताई पाटील, रंजनाताई सूर्यवंशी, बबिता ताई इंगळे, सीमाताई वर्गठ, कल्पनाताई धनविजय, दीक्षा ताई जमदाडे, मनीषाताई पाठवले, मीराताई बल्लाळ, राणीताई सोनकांबळे, माला ताई गायसमुद्रे, प्रभावती ताई बनसोडे, शोभाताई पाटील, कंचनताई सूर्यवंशी, संगीता ताई वाटोळे, कविताताई नवले, आशाताई धनद्रव्ये, कल्पनाताई प्रधान, प्रियाताई नागदेवे यांचा सहभाग विशेष होता.
बैठकीमध्ये महिलांच्या नेतृत्वाचे महत्व, स्थानिक प्रश्नांवरील संयुक्त कृती, आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीतीबाबत व्यापक चर्चा झाली.
महिला आघाडीच्या या बैठकीतून एक स्पष्ट संदेश गेला – “वंचित महिलांचा आवाज आता कुणीही थांबवू शकत नाही!”
संघटन, सजगता आणि संघर्ष हीच पुढील वाटचालीची दिशा असल्याचे ठाम मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले.

