अकोला शहरामध्ये महिला व विद्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच दामिनी पथक कार्यरत होते. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतुन आता संपुर्ण जिल्हा भर दामिनी पथक कार्यरत करण्यासाठी विषेश पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ३४ दोन चाकी वाहने उपलब्ध करून दिली आहे.
दिनांक ०९/०३/२४ पासुन अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन स्तरावर दामिनी मार्शल महिला व विद्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पेट्रोलीग चालू करण्यात आली असुन दिनांक ९/३/२४ ते २०/३/२४ पर्यंत संपुर्ण जिल्हयातील दामिनी मार्शलने आतापर्यत एकुण ८९ इसमांवर (जोडप्यांवर) प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली. तसेच एकुण ४०५ शाळा व कॉलेजेस मध्ये भेटी दिल्या असुन एकुण १०९ शाळा व कॉलेजेस मध्ये महिला संबंधीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहे.
अकोला जिल्हयामध्ये एकुण २३ पोलीस स्टेशन आहेत. त्यानुसार अकोला शहरामध्ये ८ पोलीस स्टेशनला ०२ दोन चाकी वाहणे व ग्रमिण भागातील १५ पोलीस स्टेशनला ०१ दोन चाकी वाहन असे एकुण ३१ वाहन दामिनी मार्शल म्हणुन महिला व विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन प्रभावी पेट्रोलींग करीता पुरविण्यात आले आहे. सदर दामिनी मार्शल मार्फत रोज सकाळी ७ ते ९, ११ ते १४,१७ ते २१ या दरम्यान पेट्रोलीग करण्यात येते. पेट्रोलींग दरम्यान दामिनी मार्शल हया सकाळी व सायंकाळी त्यांच्या हददीमध्ये असलेले शाळा, कॉलेजेस या ठीकाणी भेटी देतात. तसेच शाळा कॉलेजेस मध्ये महिला जनजागृती कार्यक्रम पण राबविन्यात येते. त्यांना जनजागृती महिला संबधीत असलेले हेल्प लाईन नंबर व इतर सुविधा याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच महिला संबंधित पोलीस स्टेशनच्या हददीमध्ये असलेले संवेदनशील ठिकाणी भेटी देवून क्यूआर कोड स्कॅन करण्यात येते. पेट्रोलीग दरम्यान एखादे जोडपे (महिला इसम, मुलगा मुलगी) असभ्य वर्तन करताना निदर्शनास आल्यास, एखादया पीडीत महिलेचा तीला एखादा इसम त्रास देत असल्या बाबतचा कॉल आल्यास, एखादा इसम दारू पिउन असभ्य वर्तन करतांना मिळुन आल्यास त्यांचेवर कलम ११०/११७,११२/११७ मपोका अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येते. तसेच अल्पवयीन मुले मुली मिळुन आल्यास त्यांना समज देवुन सोडण्यात येते.
सगळया जनतेला आव्हान करण्यात येते कि, एखादया मुलीला, महिलेला जर कोणी मुलगा किंवा पुरुष त्रास देत असेल तर निसंकोच होवून त्यांनी ताबडतोब पोलीस हेल्प लाइन कंमाक 112 किंवा दामिनी हेल्प लाईन नं. 7447410015 वर संपर्क करावा.


