अकोला, दि.२(जिमाका)- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते प्रतिमेस सुताचा हार व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा नाजर मोहन साठे, नायब तहसिलदार अतुल सोनवणे, ज्योती नारगुंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.