
अकोला प्रती – महाराष्ट्र शासनाने सामान्य नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात याव्या याकरिता आपले सरकार या नावाचे ॲप्स सुरू केले होते. जेणेकरून सामान्य नागरिक आपल्या तक्रारी आपले सरकार या ॲप्स वर मांडून त्यांच्या समस्येचे निराकरण होऊन तक्रारी लवकर निकाली निघतील, या उद्देशाने ॲप्स सुरू करण्यात आले होते. परंतु सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून आपले सरकार ॲप्स वर तक्रारी केल्या आहेत, परंतु त्या तक्रारी अद्यापही निकाली निघाले नाही. किंवा त्यांचे कुठलेही प्रत्युत्तर आले नाही . त्याचप्रमाणे महानगरपालिका करिता स्वच्छता नावाचा ॲप्स सुरू करण्यात आला होता. जेणेकरून वार्डातील समस्या तक्रारी या ॲप्स वर मांडून लवकरात लवकर निकाली निघतील , सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी वार्डातील समस्या, तक्रार महानगरपालिका आयुक्त यांच्या नावाने केली असुन अद्याप पर्यंत काहीच कारवाई नाही,सामान्य नागरीकांना न्याय देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ॲप्स फक्त आणि फक्त दिखावा आहे.
सामाजीक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी वार्डातील समस्या मांडून एक महिना उलटून झाला. तरीही कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर आले नाही, हे ॲप्स म्हणजे फक्त दिखवा आहे. असा आरोप उमेश सुरेशराव इंगळे यांनी केला आहे, जिल्हाधिकारी,व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे . जर नागरिकांच्या समस्या ॲप्स द्वारे निकाली निघत नसतिल तर, या ॲप्स वर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे.