वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा…
मुंबई:
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दादरच्या राजगृहाला सदिच्छा भेट दिली.
तेव्हा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा त्यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की मुंबईमध्ये असणाऱ्या इंदू मिलच्या 14 एकर जागेत आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर उभारण्यात येईल यासंदर्भातची चर्चा तेव्हा करण्यात आली. एकनाथजी शिंदे यांच्या सोबत इंदुमिल संदर्भात चर्चा करून दिपक केसरकर यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्यासाठी आणि या स्मारकाला नवीन आकार कसा देता येईल या संदर्भात जबाबदारी देण्यात आली आहे असे सांगण्यात आले.
या व्यतिरिक्त राजकीय वळणावर बोलत असताना जर महाविकास आघाडी प्रतिसाद देत नसेल तर आम्ही स्वबळावर लढणार अशी देखील प्रतिक्रिया ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत बि जे पी सोबत जाणार नाही जर महाविकास आघाडी बीजेपी सोबत जाणार असेल तर आम्ही स्वबळावर लढू अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली.
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोर्टलच्या उद्घाटनाला ते जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.