नागपूर, दि. २८ – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ल(महाज्योती) कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अधिछात्रवृत्तीसाठी अडवणूक करण्यात येत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी महाज्योती कार्यालयासघेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनीव्यवस्थापकीय संचालक, महाज्योती,नागपूर ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे दिला आहे.महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थीना अधिछात्रवृत्ती मंजूर होऊन सहा महिने उलटले असले तरी एकाही विद्यार्थ्यांस त्याचा लाभ मिळालेला नाही.शासना कडून व संचालक मंडळा कडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये आडकाठी आणली जात आहे.महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक होत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी कडून घेराव घालुन आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या संशोधन कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यात येत आहे.असा वंचित बहूजन युवा आघाडी चा आरोप आहे.
आपण बार्टी सारख्या संस्थेत केलेल्या कामामुळे आपल्या प्रशासकीय कामाचा विशेष ठसा उमटवला होता.सबब व्यवस्थापकीय संचालक ह्या नात्याने आपण पुढाकार घेऊन संचालक मंडळाचे माध्यमातून हा तिढा ३० एप्रिल २०२३ पर्यंत सोडवावा अन्यथा वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.’महाज्योती’च्या वतीने इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांचा संशोधनाचा टक्का वाढावा म्हणून अधिछात्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्तीचा लाभ द्यावा, असा निर्णय ‘महाज्योती’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.त्यानुसार अधिछात्रवृत्तीसाठी प्राप्त १५३९ अर्ज मधून मूळ कागदपत्रांची छाननी करून १२२६ जणांना अधिछात्रवृत्ती मंजूर झाली आहे.निवड झालेल्यांची तात्पुरती यादी सहा महिन्यांआधी जाहीर करण्यात आली. १ नोव्हेंबरपासून अधिछात्रवृत्ती दिली जाणार होती.प्रथम दोन वर्षासाठी दरमहा ३१ हजार रुपये, घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च वेगळा व त्यानंतर तीन वर्षांसाठी ३५ हजार रुपये दरमहा दिले जातील असे जाहीर करण्यात आले होते.लाभार्थ्यांनाही घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च वेगळा दिला जाणार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिछात्रवृत्ती दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.हे पाऊल अभिनंदन करण्यासारखे होते.मात्र, सहा महिन्यांआधी ही अधिछात्रवृत्ती मंजूर झाली असताना अद्यापही विद्यार्थ्यांना ती अदा करण्यात आलेली नाही. यामुळे अधिछात्रवृत्तीच्या भरवशावर असणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचे जाणीवपूर्वक नुकसान करण्यात येत आहे.शासनाकडून अधिछात्रवृत्ती देण्यास नवनवीन कारणे शोधून अडवणूक केली जात असल्याचा आरोप संशोधक विद्यार्थ्यांकडून होत आहे.करीता सदर निवेदनाद्वारे वंचित बहूजन युवा आघाडी अशी मागणी करते की, संचालक मंडळाचे माध्यमातून हा तिढा ३० एप्रिल २०२३ पर्यंत सोडवावा अन्यथा वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.