महाबोधी महाविहार; बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या

बोरगांव मंजु :-बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे या न्याय हक्कासाठी बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत भारताचे राष्ट्रपती महामहिम यांना शेकडो समाज बांधवांनी एका निवेदनाद्वारे दिनांक ६ मार्च रोजी मागणी केली आहे,दरम्यान बुद्ध गया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे यासाठी हजारो पूज्य भंतेजीसह शांततेच्या मार्गाने महाबोधी मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे, परंतु पोलिस प्रशासनाने भन्तेजीवर अन्याय करून लोकशाही मार्गाने चालू असलेले शांततामय आंदोलनाला राज्य व केंद्र शासनाने हाणून पाळण्याचा प्रयत्न केला आहे, आंदोलनात सहभागी भन्तेजीवर अन्याय केला आहे या अनुषंगाने अन्याय होऊ नये.

या मागण्या पूर्ण व्हाव्यात व बुद्धगया महाबोधी विहार हे मुक्त करावे आणि महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे .यासाठी बोरगाव मंजू येथील समाज बांधव व बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने सिध्दार्थ नगर स्थित बुध्द विहार येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेत उपस्थित समाज बांधवांनी तिव्र रोष व्यक्त करुन राज्य व केंद्र शासनाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी एका निवेदनाद्वारे बोरगाव मंजू पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले या वेळी बौद्ध समाज संघर्ष समिती बोरगाव मंजू, सिध्दार्थ नगर बौद्ध विहार समिती, रामजी नगर बुध्द विहार समिती,भीम नगर बुध्द विहार समिती, या सह बौद्ध बांधवांनी युवक युवती उपासक उपासिका, बौद्ध समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष गजाननभाऊ कांबळे , सचिव अस्वजीतभाऊ सिरसाट ,उपाध्यक्ष आकाश इंगळे,संजय वानखडे,जीवन डिगे, सागर खंडारे, युवराज भागवत,सागर इंगळे,आदेश इंगळे, जामनिक,उमेश इंगळे संकेत कांबळे, सचिन पालकर,ज्ञानेश्वर वानखडे, भाऊराव वानखडे ,मधुकरराव तायडे ,सखाराम वानखडे ,आनंद बागडे, गौतम इंगळे, रमेश समुद्रे जीवन गवई रविंद्र खंडारे नाना गवई, धनराज गवई ,राहुल बागडे , नितीन गवई ,शोभाबाई वानखडे, सुमनबाई वानखडे, पार्वतीबाई इंगळे ,चंदाबाई खांडेकर, भागुबाई आठवले या सह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.