
अकोल्यातील गायगांव या भागात पेट्रोल व डिसेल चे डेपो असून यामध्ये प्रामुख्याने HPCL, IOCL, BPCL या कंपन्या आहेत.
या डेपोतून दररोज लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल ट्रकच्या माध्यमातून खुल्या विक्री करिता पेट्रोल पंप वर पाठविल्या जातात. यातील बरेच ट्रक ड्रायव्हर आणि मालक हे पेट्रोल आणि डिसेलची चोरी करुन कमी दरात अवैध विक्री करण्याऱ्यांना विकतात. परिणामी पेट्रोपंप धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ह्याकरीता पेट्रोल पंप असोसिएशन व्दारा माननीय जिल्हाधिकारी साहेब, अकोला व पोलिस अधिक्षक साहेब, अकोला यांना पत्राव्दारे या अगोदरच निवेदन देण्यात आले आहे. पण कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. भविष्यात जर अवैध धंदे चालु राहीले तर कुठल्याही प्रकारची जिवीत हानीची शक्यता टाळता येणार नाही. कारण पेट्रोल आणि डिसेल हे अतिज्वलनशील पदार्थ्यामध्ये मोडले जाते.
करिता प्रशासनाने कठोर कारवाई करणे अनिवार्य आहे. अन्यथा पेट्रोल आणि डिझेल असोसिएशन व्दारा बेमुदत बंद पुकारण्यात येईल.