दि.१६/०४/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चनसिंह यांचे अध्यक्षते खाली अकोला जिल्हा मधील कोचिंग क्लासेसचे संचालक यांची पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस ८८ कोचिंग क्लासेसचे संचालक हे उपस्थती होते. सदर बैठकी मध्ये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतिश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक दरम्यान अकोला जिल्हया मधील ८८ कोचिंग क्लासेस सुरक्षा संदर्भाने पोलीस विभागा कडुन सर्वे करण्यात आला होता. ८८ कोचिंग क्लासेस पैकी ६७ ठिकाणी सि.सि.टि.व्ही., ३७ ठिकाणी सुरक्षा गार्ड, ४८ ठिकाणी आपतकालीन सुविधा, ५० तकार पेटी असल्याचे सर्वे मध्ये निदर्शनास आले. तसेच ०३ ठिकाणी अॅन्टी रॅगींग सेल, १५ ठिकाणी विशाखा समीती, ६३ ठिकाणी पोलीस हेल्प लाईन नंबर बोर्ड व ८४ ठिकाणी समोपदेशन सुविधा उपलब्ध आहेत.
त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांच्या सुरक्षा संदर्भात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहीती देण्यात आली. बैठकी दरम्यान उपस्थित मान्यवरांपैकी प्रा. देशमुख सर, प्रा. काळपांडे सर, प्रा. बाठे सर, प्रा. ढवले सर, तसेच प्रा. झाडे सर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. मनोगता दरम्यान त्यांनी अकोला जिल्हा पोलास प्रशासन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राबवित असलेल्या उपक्रमा विषयी प्रशंसा केली व तसेच पोलीस प्रशासना कडुन अपेक्षीत असलेल्या सहकार्याबद्दल मुद्दे उपस्थित केले.
मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी उपस्थित संचालक यांना विद्यार्थी सुरक्षा सदंर्भात मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी C.A.R.E.S. हया संकल्पने बाबत सविस्तर माहीती दिली. याअंतर्गत सि.सि.टि.व्ही., क्लासेस मधील प्रवेश नियंत्रण, आपत्कालीन परीस्थीती देण्यात येणारा तात्काळ प्रतिसाद, भावनिक सुरक्षा आणि संवेदशिलता याबाबत विस्तृत माहीती दिली. व उपस्थित सर्व संचालक यांना अकोला जिल्हा पोलीस प्रशासना कडुन अपेक्षीत असलेल्या सहकार्याबद्दल आश्वासन दिले. सदर बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक खोबरागडे यांनी केले.