
(राजर्षीशाहू महाराज काव्य)
आदर्शऐसा लोकनायक तुम्ही, किर्ती पसरली दिगंतरी।
शूरविरांच्या पावनभूमी, जन्मला राजा कोल्हापूरी।।ध्रु।
कणाकणाने शिक्षण घेऊन, योग्य ध्येय ते ह्रदयाशी।
धर्म राजकिय सामाजिकता, चळवळ तुमची त्याशत्रूशी।
शूरविरांच्या….
जनता माझी सुखी राहू दे, काढिलात तो जाहिरनामा l
कोल्हापूरच्या लोककल्याणा,ध्यास तुमच्या तनामना।l 2।l
शूरविरांच्या…..
दारिद्रय अन् अज्ञानाने, पिचली होती जनता सारी।
अंधश्रद्धेसह,धर्मांध्यांना झाला, दिपस्तंभत्या मार्गापरी ll ३ll
शूरविरांच्या…
अनाथांचा हा नाथ होऊनी, शिक्षणाचे अम्रुत दिधले।
गुलामिची ती बेडीझुगारून, अखंडसमाजास मुक्त केले।।
सक्तिच्या या शिक्षणापायी, गरिबांचा तुम्ही झाला वाली।
महानहोता राजाधिराज पण , हिंमत होती मराठमोळी।।4
शूरविरांच्या……
प्रजा जनांच्या हितासाठी ही, सिंहासन मी करिन खाली।
ठासून बोलले इंग्रजांशी, आता संपली तुमची खेळी।।
निरोप घेता या जनतेचा, जीवन ज्योती मालवली।
सब लोगोंको सलाम बोलो साद अशी गगनाला भिडली ll 5ll
शूरविरांच्या…..
पावनभूमी, जन्मला राजा कोल्हापूरी…
कोल्हापूर चा राजा लोकराजा राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन…
कवी : डी.एस.कौशलसर