स्थानिक गुन्हे शाखा कडुन मुर्तिजापुर येथे अवैध धंदयावर छापा..

तीन आरोपी सह ५,५३,१०० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक:

अकोला दि. ३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी मा. पोलीस अधिक्षक अकोला संदीप घुगे सा. यांचे तोंडी आदेश व माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथिल पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा येथील पथकाने पो.स्टे. मुर्तिजापुर शहर हद्दीत ग्राम सोनाळा रोड वरील शेती मालासाठी असणा-या गोडावुन च्या मागे जुगार रेड केला असता १) किशोर देविदास चतुरकर, वय ४० वर्ष, रा. संताजी नगर, मुर्तिजापुर जि. अकोला २) विजय भारत येदवर, वय ३२ वर्ष, रा. लहरिया प्लॉट, स्टेशन विभाग, मुर्तिजापुर जि. अकोला ३) जयेश विनोद कोठारी, वय ३२ वर्ष, रा. जुनी वस्ती मोरारजी चौक, मुर्तिजापुर जि. अकोला यांना जागीच पकडले व ईतर इसम पोलीसांना पाहून अंधराचा फायदा घेवुन फरार झाले. वरून तीन नमुद आरोपी जवळुन व घटनास्थळावरून असे एकुण ५२ तास पत्ते, नगदी १११०० / रू, व ०३ मोबाईल कि. ४२०००/रू व १० मो.सा. ५०००००/ रू चे असा एकुण ५,५३,१००/ रु चा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. मुर्तिजापुर शहर यांचे ताब्यात देण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिप घुगे सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सायांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, व पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, अन्सार अहमद, स्वप्नील चौधरी, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतिश पवार व चालक प्रशांत कमलाकर, प्रकाश लोखंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.