
दि.२२/०२/२०२४ रोजी फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर, वय ३३ वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. आकोट जि. अकोला यांनी आरोपी नामे श्रीकृष्ण पंडितराव लटपटे वय ३७ वर्ष रा. मलकापुर भिल ता. अकोट ह.भु. केलपानी ता. अकोट जि. अकोला याचे पांढ-या रंगाचे आयशर गाडी मध्ये महालक्ष्मी दाल मिल नवलखा इंदौर मध्य प्रदेश येथे खाली करणे कामी भरून दिलेला १४८. १५ विवंटल तुर किं. १४८१५००/ रु हा दिनांक २३/०२/२०२४ रोजीचे रात्री पर्यंत इंदौर येथे न पोहचविल्याने आरोपीने ताब्यातीत फिर्यादी यांनी विश्वासाने सोपविलेला तुर हा शेतमाल इंदौर येथे न पोहचवता परस्पर कोठेतरी विक्री करून गाड़ी जळाल्याचा बनाव केला आहे अश्या फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. दहिहंडा येथे दिनांक २५/०२/२०२४ रोजी अप क. ९१/२०२४ कलम ४०७, ४२० भा.दं. वि. चा गुन्हा दाखल झाला.सदर घटनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांना स्था. गु.शा. अकोला येथील पथक तयार करून सदर गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.त्या अनुषगाने दिनांक २६/०२/२०२४ सोमवार रोजी सकाळी १०/०० वाजता स्था. गु.शा. पो. नि. प्रमुख शंकर शेळके व त्यांचे पथका सह सर्व घटनास्थळांना भेटी दिल्या व गोपनिय पध्दतीने तपास केला असता आरोपीने स्वतः चा ट्रक स्वतः पोपटखेड हद्दीत दरीत ढकलुन देवुन जाळून टाकल्याचे व त्याआधी ट्रक मधील तुर क्रॉसिंग करून घेवुन स्वत: च्या मालकीचे दुस-या ट्रक मध्ये भरून सदर ट्रक मराठवाडयात पाठविल्याचे निष्पन्न झाले.त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरवुन आरोपीचा मराठवाडया कडे गेलेला ट्रक व आरोपी शिवम नागनाथ होळंबे वय २७ वर्ष रा. मलकापुर, केलापानी ता. अकोट जि. अकोला यास वाशिम येथील स्था. गू. शा यांचे मदतीने ताब्यात घेवून जप्त करण्यात आला. तसेच अब्दुल इकबाल अब्दुल गफ्फार वय ५० वर्ष रा. गाजी प्लॉट अकोट व आरोपी नामे अन्सारोद्दीन हसिरोददीन चय ३० वर्ष रा. पणज ता. अकोट जि. अकोला यांचे ताब्यातुन ३५ पोते तुर जप्त करून सर्व ०४ आरोपीसह एकुण मुद्देमाल अंदाजे १२ टन तुर कि.अं. १३ लाख रूपयांची व जप्त केलेला ट्रक अंदाजे कि. २४ लाख रूपये असा एकुण ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. दहिहंडा यांचे ताब्यात देण्यात आला.आरोपीने चिखलदारा पो.स्टे. ला अपघात रजिस्टर ला खोटी नोंद करवुन बनावट प्रकार केल्याचा प्रकार सदर तपासात उघडकिस आला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे सा, यांचेमार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि, राजेश जवरे, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठान, उमेश पराये, प्रमोद डोईफोडे, गोकुळ चव्हान, अक्षय बोबडे, वसिमोद्दीन, अन्सार अहेमद, स्वप्निल खेडकर, लिलाधर खंडारे, अनिल राठोड, स्वप्निल चौधरी तसेच सायबर सेल चे अंमलदार आशिष आमले यांनी पार पाडली. तसेच दहिहंडा ठाणेदार योगेश वाघमारे व अंमलदार प्रमोद लांडगे, सुदेश यादव, रामेश्वर भगत हे देखील सदर गुन्हयांचा समांतर तपास करत होते.