
अकोला: दिनांक १८/०८/२०२४ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की ग्राम वाडेगाव येथील आरोपी नामे शेख सलीम उर्फ बाबु जमदार शेख रहुल्ला वय ५२ वर्ष याने त्याचे घराजवळील गोठ्यात कत्तली करीता गोवंश कृरतेने निर्दयपणे आवश्यकते पेक्ष कमी जागेत कोंबून ठेवले आहे. अश्या मिळालेल्या माहीतीवरून सदर ठिकणी पंच व पोलीस स्टाफ सह छापा कार्यवाही केली असता, नमुद आरोपी ने त्याच्या घराजवळील १० बाय ८ फुट लांबी रुंदीच्या कमी जागेत (गोठ्यात) एकुण १६ गोवंश ज्यामध्ये १२ गाई आणि ०४ गोन्हे असे एकुण कि २,७०,०००/-रू चे निर्दयपणे व कृरतेने त्यांना चारापाणी न देता उपाशी अवस्थेत कोंबून ठेवलेले मिळूण आले. ते गोवंश व आरोपी यांना ताब्यात घेतले. गोवंश आदर्श गोसेवा केंद्र ग्राम म्हैसपुर येथे देखभाली करीता दाखल करण्यात आले, व आरोपीस पो. स्टे बाळापूर येथे पुढील कार्यवाही करीता ताब्यात देवून कलम ५,५ (क) ९,९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सह कलम ११ (ड) प्राण्यांना निर्दयतेन वागणूक कायदा अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. श्री. विजय चव्हाण पो. अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, अशोक सोनोने, तसेच चालक प्रशांत कमलाकर यांनी केली आहे