“मनोविचार “युवकांसाठी व्याख्यान सत्र संपन्न”

             26 जानेवारी प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रसेवेस व मानवतेस समर्पित  मनोविचार या कार्यक्रमाचे आयोजन  इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला अंतर्गत अकोल्यातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.सुजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष मां. गजानन नारे यांनी कला जोपासणे ही काळाची गरज असून कला ही जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.हर्षवर्धन मालोकर  यांनी युवकांची मनःस्थित या विषयावर मार्गदर्शन करीत असताना 

व्यक्ती कोणताही असो मनस्थिती आणि परिस्थिती चांगली असेल तर तो यशस्वी होतो. मन आणि विचारांची व्यक्तीला सांगड घालता आली पाहिजे, स्व ची जाणीव ठेवूनच व्यक्तीने आपले जीवन व्यतीत करावे,असे सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.आंतरराष्ट्रीय वक्त्या डॉ.अनुराधाताई तोटे मॅडम यांनी “युवकांसमोरील आव्हाने”या विषयावर चर्चात्मक मार्गदर्शन करीत असताना सोशल मीडिया चा प्रभाव,इमोशन, रिलेशनशिप , प्रेशर, अश्या उदाहरणासह तरुणाई ने याचा अभ्यास करून स्वहित लक्षात घेऊन आपल्या जिवनात आमूलाग्र बदल कसा घडऊन आणता येईल याचे चिंतन करणे आवश्यक असे विचार मांडले. ह्यानंतर आंतरराष्ट्रीय व्याख्याते मा. सचिन बुरघाटे सर यांनी”प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण “सेल्फ को पहचाणों, Ego is a very harmful everyone ,अपने आपको पहचाननेकी कोशीश करना चाहिए, कुछ नया करणे की कोशिश करना चाहिए स्क्रू का एक्झॅम्पल देकर सेल्फ का important बताया,जिवन मे रिस्क नहीं तो कही पे भी फिक्स नही. अश्या उदाहरणासह तरुणाईने आपल्या जिवनात सकारात्मक विचाराने नवचैतन्य निर्माण करावे ह्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

माजी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील सरांनी यशाची गुरुकिल्ली आणि युवकांचे सामाजिक योगदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना.प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे, पुस्तकातील दबंग व्यक्तिमत्त्व वाचुन आपले जिवन हे समाज उपयोगी होईल असे विचार व्यासपीठावरून व्यक्त केलेत. ह्यानंतर प्रा. अंजलीताई आंबेडकर मॅडम यांनी सोशल मीडिया वरील माहितिची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाप्रसंगी मेडिकल असोसिएशन चे सर्व सभासद, अकोल्यातील सर्व सुप्रसिद्ध डॉक्टर , सर्व आमंत्रित मंडळी, सर्व युवा मंडळी, व श्री शिवाजी महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नरेश वाघ, संजय मुरूमकार ,अनिकेत निखाडे, विकी क्षीरसागर व इतर सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता पांडे व कु.रसिका पालकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष पस्तापुरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.