अकोला :
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या आशेने पोलिस भरती कधी निघणार याची उत्सुकतेने वाट बघत होते.३० नोव्हेंबर ही पोलिस भरती ची अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.परंतू अर्ज भरत असताना वेबसाईटवर तांत्रिक अडचण आल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गृह विभागाने याची तातडीने दखल घेऊन १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या भवितव्याचा विचार करुन निर्णय घ्यावा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष ललित प्रभाकर नगराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.