
स्थानिक: अकोला
नागपूर येथे दिनांक 21 ते 22 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सायकल पोलो स्पर्धेत सब जुनियर, ज्युनिअर, व सीनियर राज्यस्तरीय स्पर्धेत अकोला जिल्ह्याच्या संघाने सब ज्युनिअर व सीनियर पुरुष संघाने तृतीय स्थान पटकाविले तसेच महिला संघाने द्वितीय स्थान पटकाविले असून राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा 2025 राणा घाट, हबीपूर नाडिया. पश्चिम बंगाल येथे दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान होत आहेत.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व सबज्यूनियर व सीनियर मुलांचा संघ सहभागी होत आहे त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून लक्ष संजय मोहोड याची राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने त्याची पश्चिम बंगाल येथे राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेत सहभागी होईल. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच जिल्हा संघटनेचे सचिव नारायण बक्तुले व सहसचिव मोहम्मद जावेद, अविनाश बनसोड, प्रभाकरजी रुमाले, जावेद अली, उजळे सर, बबलू रामटेके, राजूभाऊ गोतमारे सागर गवई यांना देतो.