
स्थानिक: अकोला येथे नुकताच झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मध्ये जुना तारफाईल येथील रहवासी कुमारी रुणाली रवींद्र डोंगरे ही प्रथम ठरली.
अत्यंत हलाखीच्या परीस्थितीतून प्रचंड जिद्द आणि चिकाटिने तिने हे यश संपादन केल्याचे सांगितल्या जात आहे. रुणाली हिने संपादन केलेल्या भरीव कामगिरी साठी अनेक स्थरावरून तिचे अभिनंदन केले जात आहे.
तेव्हा तिच्या महाविद्यालयाचे संचालक प्रकाश ढवले यांच्यातर्फे तिचे स्वागत करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय ते जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्रभट्ट , तिचे पालक रवींद्र डोंगरे, सरलाताई डोंगरे, काका महेंद्र डोंगरे, काकू किरण ताई डोंगरे आणि परिसरातील नागरिकांना देत आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.