
स्थानिक: अकोला
देगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय यांच्या कडून साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले वाड: मय पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय सातत्याने नवनवीन समाज उपयोगी उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक उपक्रम, अभ्यासिका, करियर मार्गदर्शन असे अनेक कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. त्यात एक भर म्हणून साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाड: मय पुरस्कार देण्याचे योजिले आहे. त्यासाठी साहित्यिकांनी दि. १ एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळात प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी,गझलसंग्रह, ललितलेख संग्रह, चारोळी संग्रह, बालसाहित्य, आदिवासी साहित्य ,चरित्र ग्रंथ संग्रह, वैचारिक लेखसंग्रह, नाटक लेखन प्रकारातील पुस्तके दि. १० नोव्हेंबर २०२२ पुर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. अशोक शिरसाट, संस्थापक अध्यक्ष , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय , देगांव ता. बाळापूर जि. अकोला – ४४४५०२. या पत्यावर पाठवावेत अशी माहिती देण्यात आली.
या तारखेनंतर प्राप्त साहित्य कृतींचा विचार करण्यांत येणार नाही. पुरस्कारासाठी पुस्तके दोन प्रतीत अल्प परिचय व एक पासपोर्ट फोटो सह पाठवावेत. पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते आयोजित साहित्य संमेलनात सन्मानाने प्रदान करण्यांत येईल. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे राहिल.साहित्यकृती या कालावधीतच पाठविण्याचे असे आवाहन नागसेन भाऊ अंभोरे, मोहन अवचार , मनोहर इंगळे , सुमेध अंभोरे देगांवकर यांनी केले आहे.