
कोल्हापूर :
मु. पो. कुंभोज ता. हातकणंगले जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झालेले दिवंगत भगवंत कृष्णा देवमोरे गुरुजी यांचे 3 नोव्हेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अविरतपणे शिक्षण क्षेत्रात सेवा देण्याचे कार्य त्यांनी केले होते. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले आहे. समाजसेवेत देखील ते अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिवंगत भगवंत देवमोरे गुरुजी यांच्या मातीचा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ९ वाजता राहील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशी माहिती परिवारातील संबंधित व्यक्तींनी दिली आहे.