कविवर्य सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त “ऋतू असे छळतात का” हा गजल अल्बम होणार रिलीज..

स्थानीक:

        कविवर्य सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांच्या यूट्यूब चैनल वरून "ऋतू असे छळतात का" हा मराठी गझलांचा अल्बम रिलीज होणार आहे. या अल्बम मधील सर्व गझल कविवर्य सुरेश भट यांनी लिहिले असून याची संकल्पना व संगीत प्रा.डॉ.कुणाल इंगळे यांचे आहे. या अल्बम मधील प्रथम गझल  "इतकेच मला  जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" ही गझल पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या आवाजात रिलीज होणार आहे व सोबतच सुप्रसिद्ध गायक  पद्मश्री अनुप जलोटा,वैशाली माडे, डॉ.कुणाल इंगळे अशा अनेक  कलाकारांनी या अल्बम मध्ये गझल गायन केलेले आहे. युट्युब सोबतच सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मस वर ह्या सर्व गझल उपलब्ध राहणार आहे.  सर्व श्रोत्यांनी हा अल्बम जरूर ऐकावा व लाईक करून अल्बम ला शेअर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 
      या अल्बम करिता प्रा. डॉ.  राजीव बोरकर संचालक विद्यार्थी विकास अमरावती विद्यापीठ अमरावती, प्रा. डॉ. हर्षवर्धन मानकर संगीत विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय अकोला, प्रा. डॉ. सोपान वतारे, प्रा. डॉ. शिरीष कडू, प्रा. डॉ.विशाल कोरडे यांनी या अल्बम करीता शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published.