काळे काच – फॅन्सी नंबरवाल्यांची खैर नाही! अकोला पोलिसांची धडक नाकाबंदी मोहीम सुरू

अकोला (प्रतिनिधी):अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांच्या आदेशावरून १७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अकोला शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली.या कारवाईत पोलीस आणि वाहतूक विभागाने मिळून एकूण १५७९ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये १२०१ दुचाकी आणि ३६८ चारचाकी वाहनांचा समावेश होता. नियम मोडणाऱ्या ६१३ वाहनचालकांवर कारवाई करत ३,५५,४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यातील २५,५०० रुपये दंड तत्काळ वसूल देखील करण्यात आला.कोणत्या कारणांमुळे कारवाई झाली?ट्रिपल सीट वाहन चालवणेनंबर प्लेट न लावणेसिग्नल तोडणेपरवाना नसणेगाडी चालवताना मोबाईलवर बोलणेफॅन्सी नंबर प्लेटसीट बेल्ट न लावणेकाळ्या काचा लावलेल्या गाड्याही मोहीम झिगझॅग बॅरीकेटींगद्वारे अचानक नाकाबंदी करून राबवण्यात आली होती. शहर वाहतूक शाखा व सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.आता १० दिवस चालणार विशेष मोहीम१८ मेपासून २७ मे २०२५ पर्यंत, अकोला जिल्ह्यात फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेत नियम मोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन“वाहतूक नियम पाळा, गाडीची सगळी कागदपत्रे बरोबर ठेवा आणि वाहनावर पेंडिंग दंड असेल तर तात्काळ पोलीस ठाणे किंवा वाहतूक कार्यालयात जाऊन भरा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांनी केले आहे.वाहनचालकांसाठी महत्वाची सूचनागाडी चालवताना लायसन्स बरोबर ठेवामोबाईलवर बोलणे टाळानंबर प्लेट नियमांनुसार लावाकाळ्या काचा काढून टाकानियम मोडल्यास कारवाई अटळ!

Leave a Reply

Your email address will not be published.