पत्रकारावर हल्ला प्रकरणी अखेर…चार हल्लेखोरांना चिखलीहून अटक

अकोला प्रतिनिधी: पोलीस स्टेशन चान्नी अप क २५३/२४ कलम ३२४.२९४,१४३,१४७,१४८४२७,५०६, वाढीव कलम ३२९ भादवि मधील फरार आरोपी यांची गोपणीय तसेच तांत्रीक मदतीने माहीती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी याचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी स.पो.नि. विजय चव्हाण यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन चान्नी येथील पोलीस पथकानी ता. चिखली, जिल्हा बुलढाणा येथे जावून एका हॉटेल मधुन आरोपी ०१. रविंद्र अनिरुध्द महानकार, वय ३६ वर्षे, ०२. समिर अरविंद देशमुख, वय २६ वर्षे, ०३. कैलास परशराम वाहोकार, वय २६, २४. शुभम नागोराव देशमुख वय २७ वर्षे, तसेच आरोपीतांसोबत असलेला वाहन चालक रोहीत भगवान दांदळे वय ३० वर्षे सर्व रा. पिंपळखुटा यानी गुन्हयाची व गुन्हयाच्या घटनेची माहीती असताना आरोपी क्र. ०१ ने ०४ यांना कायदेशीर अटकेपासून बचाव करण्याकरीता शिक्षेपासून वाचविण्या करीता एका ठिकाणी वाहन दुस-या ठिकाणी प्रवास करण्याकरीता व आरोपीतांचे मोबाईल बंद असताना स्वताःचा मोबाईल देवुन गुन्हयात सहकार्य केले असल्याने आ.क. ०१ ते ०४ सह वाहन चालक रोहीत भगवान दादले वय ३० वर्षे रा. पिपळखुटा यांचा गुन्हयात आरोपी म्हणुन वाढ करून तसेन गुन्हयात कलम २१२ भादवि प्रमाणे वाढ करून आरोपी क ०१ ते ०५ यांना गुन्हयाचे तपासात अटक करून पातुर पोलीस स्टेशन येथे हवालात बंद केले आहे. आरोपीतांचा गुन्हयाचे तपासकामी पिसीआर घेवुन गुन्हयाचा पुढील तपास करण्याची तजविज ठेवली आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा, जि. अकोला, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, जि अकोला, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापुर श्री. गोकुळ राज जी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजय चव्हाण, प्रभारी अधिकारी, पोस्टे चान्नी यांचे नेतृत्त्वात पो उपनि संजय कोहळे, पोहेकों दिनेश झटाले, पो. कॉ. सुधाकर करवते, उमेश सांगळे, सुरेश चव्हाण यांनी केली असून पुढील तपास पो उपनि. संजय कोहळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.