
शिवाजी महाविद्यालय, अकोला येथील एनसीसी कॅडेट्सद्वारे आयोजित अकरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अकोला, यांनी डॉ. आबासाहेब उर्फ गोपाळराव खेड़कर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ११ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर शशी कुमार नायक , अजित पवार, डॉ.संजय तिडके, प्रा.माडसने इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच , एनसीसी कॅडेट्सने देशभक्तीची भावना जागृत करत कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान, विविध वक्त्यांनी आर्मी दिवसाचे महत्त्व व भारतीय लष्कराच्या योगदानाविषयी माहिती दिली. कॅप्टन डॉ. आनंदा काळे यांनी गारोवोद्गार व्यक्त केले व भारतीय लष्कराच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला.
हा उपक्रम युवकांना प्रेरणा देणारा व राष्ट्रीय भावना वृद्धिंगत करणारा ठरला आहे.