जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या त्रासा विरोधात वंचित युवा आघाडीचे “हात जोडो आंदोलन”

अकोला दि. १४- विविध सरकारी प्रकल्पात जमीन आणि घरे गेलेले प्रकल्पग्रस्ता करीता उपजिल्हाधिकारी कार्यालय छळ छावणी बनले आहे. ह्या प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या त्रासा विरोधात वंचित युवा आघाडीचे वतीने आज फ्लेक्स वर छापील निवेदन देऊन प्रकल्पग्रस्ताना त्रास देऊ नका अश्या विनंत्या करत अभिनव “हात जोडो आंदोलन” करण्यात आले.जिल्हा मध्ये धरण, रस्ते आणि इतर शासकीय उपक्रमा करीता सरकारने जिल्हा मधील नागरिकांच्या जमीन व घरे संपादित करून प्रकल्प उभे केले आहेत.सदर प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे देण्याची जबाबदारी सदाशिव शेलार ह्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आहे.त्यांचे कार्यालय प्रकल्पग्रस्त साठी अगदी छळ छावणी बनले आहे.

पाच वर्षे अधिक काळा पासून अनेक प्रकल्पग्रस्त त्यांचे कार्यालयात चकरा मारून त्रस्त झाले आहेत. ह्या कार्यालयात यादीत नसलेले कागदपत्रे सादर करण्याची सक्ती केली जाते.सुनावणी साठी तारीख दिली की अधिकारी गैरहजर असतात.ज्याचे कडे टेबल आहे ते लिपिक अत्यंत उर्मट वागणूक देत असल्याच्या तक्रारी वंचित बहूजन युवा आघाडीला प्राप्त झाल्या होत्या.त्यावर आज वंचित बहूजन युवा आघाडी अकोला जिल्हा आणि महानगर पदाधिकारी ह्यांनी अभिनव पद्धतीने शेलार ह्यांचा समाचार घेण्याचा निर्णय घेतला.युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रदादा पातोडे ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा आघाडी ने प्रकल्पग्रस्त छळ छावणी बंद करा, अश्या आशयाचे छापील निवेदन फ्रेम करून घेतले आणि उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार ह्यांचे हातात ती फ्रेमवजा निवेदन युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महानगर युवा अध्यक्ष जय तायडे, महानगर युवा अध्यक्ष आशिष मांगुलकर ह्यांनी शेलार ह्याना निवेदन सोपवले.त्यानंतर जिल्हा आणि महानगर युवा आघाडीचे प्रत्येक पदाधिकारी ह्यांनी व्यक्तिकरित्या स्वतःचा परिचय देत ” प्रकल्प ग्रस्ताना त्रास देऊ नका, त्यांचा छळ करू नका” असा आर्जव करणा-या विनंत्या करायला घेतल्या.त्यामुळे उपजिल्हाधिकारी शेलार भांबावून गेले.ते खुलासा करीत असताना पदाधिकारी मात्र हात जोडून विनंत्या करीत असल्याने त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते.युवा आघाडीच्या महानगर मधील एका कार्यकर्त्यांने चक्क शेलार ह्यांचे पायाला हात लाऊन प्रकल्पग्रस्त ह्यांची प्रकरणे वेळेत निकाली काढा त्यांना त्रास देऊ नका अशी विनंती केली.ह्या अभिनव पद्धतीने दिलेल्या निवेदनामुळे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा सुरु झाली होती.आज हात जोडले असून कार्यालयीन कामकाज दुरुस्त न झाल्यास युवा आघाडी आपल्या स्टाईलने दुरुस्ती करून घेईल असा इशारा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला.

निवेदन देताना ह्या वेळी सचिन शिराळे,विकास संदांशिव युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गवई, निलेश इंगळे, नितीन वानखडे, सुबोध डोंगरे, संतोष वनवे, सचिव आनंद खंडारे , श्रीकृष्ण देवकुनबी, महानगर पूर्व संघटक रितेश भाऊ यादव, वैभव वाघमारे ,अक्षय वाघ,साहिल गोपनारायण,निशांत बागडे, आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.