
अकोला पोलीस दलाअंतर्गत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे कार्य सातत्याने चालु असते. समाजातील एक महत्वाचा घटक म्हणजे वयोवृध्द ‘जेष्ठ नागरीक’ होय. जेष्ठ नागरीकांचे अडचणी, कुटुंबाकडुन होणारा अत्याचार हयाची दखल घेण्यासाठी अकोला पोलीसांनी मोलाची पाऊले उचलली आहेत. मागील सन १ जाने २०२४ ते आजपावेतो २०२५ मध्ये ३२२जेष्ठ नागरीकांसोबत संपर्क करण्यात आला आहे. जेष्ठ नागरीकांवर होणा-या किरकोळ तसेच गंभीर मुव्हयांची दखल अकोला पोलीस दल गांभीर्याने घेत असते. जेष्ठ नागरीकांकरीता तात्काळ मदत म्हणुन डायल ११२ तसेच १०९१ सारख्या हेल्पलाईन ची सुविधा करण्यात आली. सदर अत्याचारग्रस्त जेष्ठ नागरीकास घटनास्थळी पोलीस सेवा पुरविण्याचे कार्य केले जाते. डायल ११२ वर १ जाने से आजपावेतो १६६१ कॉल ची नोंदणी झालेली आहे. “डायल ११२ वर आलेली तकार ला आजपावेतो ची तात्काळ प्रतिसाद ” वेळ ५ मिनिट ५७ सेकंद नोंदविली आहे.”
पोलीस स्टेशन खदान हददीतील ६७ वर्षीय महिला यांचा डायल ११२ वर दिनांक. २५/२/२०२५ रोजी रात्री २३.२९ वाजता कॉल आला की, त्या वृध्द महिलेला त्यांचा भाऊ चाकू घेवुन मारण्यास आला. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत खदान पोलीस स्टेशन नी अवघ्या ६ मिनिट ४९ सेकंद मध्ये घटनास्थळी धाव घेतली व सदर युवकास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेवर कायदेशिर कारवाई केली व होणारा गंभीर गुन्हा टाळल्या गेला.
पोस्टे सिव्हिल लाईन हददीतील महिला वय ६० वर्ष दुरध्वनी क्रमांक. ९३०७४१६२४७ वरूण रात्री १/५९ वाजता कॉल आला सदर महिलेला स्वताच्या घरातील लोक बांधुन ठेवुन मारहान करत होते. सदर घटनास्थळी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन नी ८ मिनिटे १० सेकंद मध्ये पोलीस मदत पुरविण्यात आली कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन सदर महिलेला मदत केली.
शहर विभागातच नाही तर ग्रामीण भागात सुध्दा सदर कार्य सातत्याने व तातडीने चालु असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते, दिनांक. ११/३/२०२४ रोजी रात्री ११/२८ वाजता पोलीस स्टेशन बार्शिटाकळी हददीतील ग्राम पुणोती येथील जेष्ठ नागरीकास त्यांचा मुलगा दारू पिवुन नारहान करत आहे तसेच घरातील सामान फेकत असल्याची माहिती डायल ११२ वर मिळाल्याने अवघ्या ७मिनिट ५० सेकंद मध्ये पोलीसांनी घटनास्थळी धावा घेवुन सदर घटनेतील दारू पिलेल्या व्यक्तीला भांडण करण्यापासुन परावृत्त केले-मारहणन करण्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचे कायदेशीर कारवाई केली. अशा अनेक अनुचित घटना टाळण्याचे कार्य अकोला पोलीस करीत आहेत.
एल्डरलाईन १४५६७ हया नॅशनल हेल्पलाईन बाबत माहिती देवून सदर हेल्पलाईन ही जेष्ठ नागरिक यांचे प्रश्नांचे निराकरण करून त्यांना वृध्दाश्रम सेवा पुरविणे, बेघर आणि अत्याचारग्रस्त जेष्ठांची मदत करणे, कायदेशिर आणि पेन्शन संबंधित समस्या निराकरण करणे, तसेच जेष्ठ नागरिक संघामार्फत एकटे राहणारे जेष्ठ नागरिकांच्या घरी भेटी देवुन त्यांच्या अडीअडचणी विचारून त्यांचे निराकरण केले जाते.