अकोला :- सर्किट हाऊस येथे “जय भीम प्रहार “सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीरज शिरसाठ साहेब व राजकुमार काळे साहेब यांनी घेतलेल्या निर्णयानुसार संघटनेचा विलगीकरण भारतीय बौद्ध महासभेमध्ये करण्यात आले. जय भीम प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे संघटनेचे अमरावती,अकोला,बुलढाणा , वाशिम, पुणे अशा सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी आज पासून डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात काम करतील असे मत नीरज शिरसाठ यांनी व्यक्त केले डॉ.अरुण चक्रनारायण जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा देवलाल तायडे, सुनील शिरसाठ महानगर अध्यक्ष , भारतीय बौद्ध महासभा यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व नियुक्तीपत्र देऊन प्रवेश दिला या प्रसंगी अकोला सर्किट हाऊसला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सुनील शिरसाठ महानगर अध्यक्ष अकोला , विशाल दामोदर जिल्हाध्यक्ष बुलढाणा, रोशन डहाणे जिल्हाध्यक्ष अकोला, ऍड. सी.ए. दंदी, एम.एम. तायडे , दिवाकर गवई, हिम्मतराव सदाशिव यशवंत इंगोले, आनंदा पळसपगार, अविनाश तेलगोटे, बाळासाहेब अंभोरे, डी एस तायडे मिलिंद तायडे , सत्यशील तायडे,गजानन तायडे, सुनील दामोदर, इरभान तायडे, संतोष भोजने आदी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
——————-