इयत्ता १० वी १२मधे प्राविण्य प्राप्त ४१ पोलीस पाल्यांचा मा. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गुणगौरव सत्कार

अकोला: दिनांक २२.०६,२०२४ रोजी दुपारी १६.०० वा राणी महल अकोला पोलीस लॉन अकोला येथे मा. पोलीस अधीक्षक, बच्चन सिंह यांच्या अध्यदक्षते खाली इयत्ता १० वी १२गधे प्राविण्य प्राप्त पोलीरा पाल्यांचा गुणगौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमा करीता मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, मा. सतिश कुळकर्णी उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग यांची प्रमुख उपस्थीती होती,

सदर कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांचे आगमण व स्वागताने झाली. नुकतेच १० वी १२ वी चे निकाल लागला असुन पोलीस कुटुंबातील गुणवंत विदयार्थी यांचे कौतुक करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. एकुण १० वी १२ वी मध्ये प्राविण्य प्राप्त एकुण ४१ विदयार्थाचा त्यामध्ये इयत्ता १० वी मध्ये पोलीस स्टेशन बाळापुर पोना संजिव कोल्हटकर यांची मुलगी ऋचा हिला ९६.६० टक्के, पोहवा शेषराव ठाकरे पोलीस मुख्या याची मुलगी निकीता हिला ९४.६० टक्के, पोहवा आश्विन मिश्रा पोलीस मुख्या यांची मुलगी रिशी हिला ९३.६० टक्के मार्क तर इयता १२ वी मध्ये पोलीस उपनिरीक्षक रविंद्र करणकार पोरटे जुने शहर यांचा मुलगा तेजस ९१. १७ टक्के, पोहवा गिरीष पांडे वायरलेस विभाग यांवा गुलगा पार्थ याला ८९टक्के, पोशि. विजय गावंडे पो. स्टे रामदासपेठ यांचा मुलगी संचिता ८५.६७ टक्के मार्कस मिळाले. अकोला पोलीस दलातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम तीन प्राविण्य मिळविलेले पाल्य तसेच इतर सर्व गुणवत्ता प्राप्त पोलीस पाल्यांचा गा. पोलीस अधीक्षक यांच्या शुभ हस्ते भेट वस्तु देवून गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर पोलीस पाल्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आनंद व्यक्त करत पोलीस विभागाचे आभार मानले तसेच पुढील शिक्षणाकरिता सदर चा कार्यक्रम हा प्रेरणा देणारा ठरला असे मत व्यक्त केले.

त्यांनतर मा. सतिश कुळकर्णी उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग यांनी आपले मार्गदर्शन केले आपल्या मनोगतातुन अभ्यासावर जास्त भर दयावा असे मत व्यक्त केले. अपर पोलीस अधीक्षक मा. अभय डोंगरे यांनी सर्व पाल्य व पालकांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मा. पोलीस अधीक्षक यांनी १० वी १२ वी नंतर पुढील शैक्षणीक बाबीवर प्रकाश टाकत उज्वल भविष्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले. आपले स्वःताचे अनुभव सांगितले व पोलीस पाल्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावर समाधान न राहता अजुन याहीपेक्षा जास्त प्रयत्न करावे अकोला पोलीस दलातील आजचे पाल्य हे उदयावे डॉक्टर, इंजीनियर, एमपीएसी, युपीएसी यशस्वी रीत्या पार पाडुन आपले

व आपल्या वडीलांचे तसेच अकोला पोलीसांचे नाव उंचावतील असा आशावाद व्यक्त केला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थागुशा, राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके व त्यांची टीम, यांनी विषेश सहकार्य केले. तर आभार प्रदर्शन श्री विजय नाफडे प्र. उपविभागीय पोलीस अधीकारी (पो.मु.) व सुत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.