महागाव: श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सवना येथे संविधान दिनाच्या निमीत्ताने “संविधान गौरव दिन” संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षता विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका आदरनीय सौ.माया राऊत मॅडम यांनी केले, तर प्रमुख वक्ते म्हणून मा. जयशील कांबळे(भारतीय विद्यार्थी मोर्चा,महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते. “माझे शिक्षण माझ्या समाजा साठी” हे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवत आपल्या शिक्षणाचा वापर बहुजन समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी करायला हवा असे मत जयशील कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी एम.सी.वी.सी. विभाग प्रमुख प्राध्यापक भोयर सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक कोळी सर व माध्यमिक विभाग प्रमुख योगेश चव्हाण सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रंचालन प्राध्यापक श्रद्धा चव्हाण मॅडम व आभार प्रदर्शन स्नेहल रोडगे मॅडम यांनी केले.