अकोला, दि.20
एमपीएससी व यूपीएससी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आय. आर. एस. अधिकारी समीर वानखेडे उद्या शनिवार ता. २१ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी १०.३० वाजता ते अशोक वाटिका येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ते विश्रामगृह अकोला येथे अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती विकास पवार यांनी दिली. समीर वानखेडे हे २००८ च्या | बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. २०२१ पर्यंत त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले. एनसीबीमध्ये सामील होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले आहे.