
स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी आरोपीस केली अटक
स्थानिक: बुलढाणा येथील शेगाव भागात असणाऱ्या पोलीस स्टेशन शेगांव शहर येथे अज्ञात आरोपी विरुध्द अप.क्र.२६८/२३ कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नींद असुन तपासावर आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे शेख ईरशाद शे.आजम वय २८ वर्ष रा. गूडवाला प्लाट जूने शहर अकोला हा निष्पन्न झाल्यापासून सदर गुन्हयात फरार असल्याने पो.नि.शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी नमूद फरार आरोपी याचा शोध घेणे बाबत तपास पथकातील अधिकारी सपोनि कैलास भगत व त्याचे पथकातील अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्यानूषगाने सपोनि कैलास भगत व त्याचे पथकातील अंमलदार यांनी नमूद आरोपीचा शोध घेतला असता नमूद आरोपी हा दि.६/८/२३ रोजी लक्झरी बस स्टॅंड येथे येत आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने सपोनि कैलास भगत यांनी लक्झरी बस स्टॅंड येथे सापळा रचून शेख ईरशाद शे, आजम वय २८ वर्ष रा. गुडबाल प्लाट जुने शहर अकोला बारा पकडून ताब्यात घेतले व पुढील तपास कामी पो.स्टे. शेगाव शहर यावे ताब्यात दिले.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. संदिप घुगे, सा जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री अमय डोंगरे सा, पोलीस निरीक्षक, शंकर शेळके यांचे मागर्दशना खाली सपोनि कैलास भगत, पोलीस अमलदार रवि खंडारे अब्दुल माजीद, संतोष दाभाडे, ऐजाज अहमद, अमोल दिपके, चालक पो. कॉ. नफीज शेख स्थानिक गुन्हे शाखा, अकोला