स्त्री म्हणजे जन्मदाता… स्त्री म्हणजे संस्कृती… स्त्री म्हणजे सहनशीलता…
स्त्री म्हणजे घराचं घरपण… स्त्री म्हणजे महान कार्य… अशा स्त्री शक्तीला मनाचा मुजरा …
आंतरराष्ट्रीय महिला दिवस अर्थात जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रियांविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव,सन्मान,व्यक्त करण्यासाठी हा दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव तसेच आठवण व्हावी, आपले महत्व कळावे म्हणून दर वर्षी आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असते . जगाच्या इतिहासात महिलांनी अलौकिक अशी कामगिरी बजावली आहे त्यामुळे त्यांची इतिहासात ओळख निर्माण झाली आहे.
सर्व प्रथम शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, “मेरी झाशी कभी नहीं दुंगी” असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई, त्यांचीच बाजू म्हणून ओळखल्या जाणारी वीरांगना ” झलकारी बाई” स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना, शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या “क्रांतिज्योती सावित्री बाई फुले..” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनना शिक्षणासाठी स्वतः कष्ट करून पैसे पाठविणारी “रमाबाई” या भारत देशात विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिला की ज्या इतिहासाच्या पानावर अजरामर झाल्या. देशाच्या महिला पंतप्रधान “श्रीमती इंदिरा गांधी” भारताच्या राष्ट्रपती पदी निवड झालेल्या सन्माननीय प्रतिभाताई पाटील, भारतीय पोलिस सेवेत अधिकार पदी असलेल्या ” किरण बेदी” आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती पथा वर आहेत . शेतीतील मजुरा पासून तर राष्ट्रपती पदा पर्यंत तसेच डॉक्टर, वकील, पोलीस निरीक्षक,पायलट, खेडाळू,तलाठी, ग्रामसेवक, अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
या सर्व महान स्त्रियांची या महिला दिनी आठवण करून त्यांची प्रेरणा घेवून त्यांच्या कार्याला अभिवादन करून हा महिला दिवस साजरा करण्यात येत असतो. महिलांना कुठलीच गोष्ट सहजा सहजी मिळाली नाही. तिला स्वतःचे अधिकार मागण्यासाठी संघर्ष करावाच लागला. स्वतःच्या हक्कासाठी मैदानावर उतरा वेंच लागले. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे ८ मार्च १९०८ साली न्यूयॉर्क मध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी होती या कारणामुळे सर्व स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी सर्व महिला कामगारांनी ” रूट गर्स” नामक चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. महिला कामगारांना दहा तास काम आणि कामाच्या जागी सुरक्षितता प्रदान करण्यात यावी या मागण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. याच बरोबर लिंग, वर्ण,शैक्षणिक, स्त्री,पुरुष,यांना मतदानाचा हक्क दिला जावा.अशी देखील मागणी करण्यात आली. हा संघर्ष जगाच्या इतिहासात पहिला संघर्ष ठरला. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिका मधील महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणीत ८ मार्च हा दिवस जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय महिला दीन म्हणून स्वीकारला जावा असा ठराव “क्लारा झेटगी” यांनी मांडला होता. तो पास देखील झाला. यानंतर अमेरिका ,युरोप, अशा अनेक देशात सार्वजनिक मतदानाच्या अधिकारा करीता विविध मोहिमा राबविण्यात आल्या. याचे परिणाम स्वरूप १९१८ मद्ये इंग्लंड आणि १९१९ मधे अमेरिका या देशात मान्यता प्राप्त झाली. भारत देशात प्रथम जागतिक महिला दीन मुंबई शहरात ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला होता. जगाच्या पाठीवर शुर विर महिला होऊन गेल्यात त्यांनी ह्या दिवसाला मान्यता प्राप्त करण्यासाठी अतिशय संघर्ष केला आणि आज आपण जगातील सर्व महिला हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहोत.
जगातील संपूर्ण महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा…
लता मनोज लोणारे
(भारतीय बौद्ध महासभा महानगर महिला प्रमुख अकोला)