
स्थानिक:
अकोला येथील शासकीय आयटीआय अकोला संस्था स्तरीय क्रीडा स्पर्धा स्थानिक वसंत देसाई क्रीडा संकुल येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शरदचंद्र ठोकरे यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी संस्थेचे प्राचार्य सुनील घोंगडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यात खोखो, कबड्डी हॉलीबॉल आणि 100 मीटर धावणे या मुला मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
कबड्डीच्या आठ चमू मध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा होऊन अंतिम चमुची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पवन धारपवार आणि गौरव गायकवाड हे प्रशिक्षणार्थी विशेषत्वाने गाजले.
100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मयूर वानखडे हा तर मुलींमधून गायत्री टाले ही प्रथम आली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्राचार्य सुनील घोंगडे तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शरदचंद्र ठोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सांघिक तसेच वैयक्तिक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाने विजेत्या खेळाडूंना चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वीते करिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथील सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक तसेच कार्यालयीन कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी: कुणाल मेश्राम