जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात ‘वंचित’ चे अभिनव आंदोलन !

सभागृहात सफाई आणि शहरात २१ ठिकाणीं स्वाक्षरी अभियान संपन्न.

अकोला : शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज अकोला जिजाऊ सभागृहाचे परिसरात सफाई अभियान प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. तसेच शहरातील २१ प्रमूख चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. सकाळी ८ वाजता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ माँ साहेब ह्यांना वंदन करीत सफाई अभियान सुरू करण्यात आले.

ह्या सफाई अभियानात प्रा अंजलीताई आंबेडकर तसेच युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वत: परिसराची सफाई केली. त्याच वेळी शहरातील इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिविल लाईन्स चौक मोठी उमरी चौक अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक, हनुमान चौक, जठारपेठ चौक, शिवाजी पार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवनी चौक रतनलाल प्लॉट चौक, महाकाली/ नेहरू पार्क, शिवर चौक या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.ह्याच पेंडोल मध्ये जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.दरम्यान १९ फेब्रुवारी पर्यंत जिजाऊ सभागृहाचे नूतनीकरण न झाल्यास शहरात रथ यात्रा काढून जनते कडून पाच पाच रुपये गोळा करून सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा इशारा प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी दिला.

कार्यकारी अभियंता दिशाभूल करीत असल्याने ठिय्या आंदोलन.

सभागृह दुरावस्था विरुद्ध स्वाक्षरी मोहिमेतील सह्यांचे अर्ज सादर करण्यास व चर्चा करण्यास निवासी उपजिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता ह्यांचे सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.मात्र कार्यकारी अभियंता दिशाभूल करीत असल्याने संतप्त पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी आर डी सी ह्यांचे दालनात ठिय्या मांडला.प्रचंड घोषणा देण्यात आल्या आणि कार्यकारी अभियंता व विभागीय अभियंता ह्याचे कडे लोकवर्गणी मागणी करीत महिलानी पदर पसरले.अधिकारी दाद देत नसल्याने त्यांचे अंगावरून ५ – ५ रुपये ओवाळून सभागृहाचा निधी गोळा करायला सुरुवात झाली.आणि स्वक्षरीच्चे गठ्ठे त्यांना सोपविण्यात आले.


वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सूजातदादा आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंदजी भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,युवा जि. महासचिव राजकुमार दामोदर, शोभाताई शेळके, जि प अध्यक्ष संगीताताई अढाऊ, आम्रपालीताई खंडारे (जि प सभापती),
रिझवाना परविन (जि प सभापती), मायायाई नाईक (जि प सभापती), पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे,
पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, निलेशजी देव, जि प सदस्य पुष्पाताई इंगळे, महानगर अध्यक्ष कलीमखान पठाण, महासचिव गजानन गवई, महीला अध्यक्ष वंदनाताई वासनिक, दादाराव पवार, ज्ञानेश्वर सुलताने, दामोदर जगताप, प्रतिभाताई अवचार,दिपक गवई,आकाश शिरसाट, महेंद्र डोंगरे, सुरेश शिरसाट, आनंद खंडारे,शाहीद खान, किशोर जामनिक, प्रशिक मोरे, विकास सदांशिव, नितीन सपकाळ,अमर डिकाऊ, गजानन दांडगे,मधु गोपनारायण,आतिश शिरसाट, शंकर इंगोले, गोपाल चव्हाण,गोरशिंग राठोड,संजय किर्तक, सचिन शिराळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.