जानकारी वाली अदालत कार्यक्रम सक्सेस मराठी स्पीकिंग क्लासेस मध्ये संपन्न.

हिवरखेड शहरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्यासाठी मराठी भाषा शिकण्याची शाळा हा उपक्रम मागील वर्षी सुरु करण्यात आला.

या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषा व्यवहारात आणल्याने त्यासाठी निर्माण होणारी आपुलकी, आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषा शासनाने अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले जाते.

व्यक्तिमत्व विकास, भाषण कसे द्यायचे, बोलायचे कसे, समाजामध्ये राहायचे कसे, स्पर्धा परीक्षेची कशी तयारी करायची, स्वतःचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं करायचं असे कित्येक विषयावर मार्गदर्शन केले जाते. याच शाळेमध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शासनाच्या कोणत्याही विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना सन्मानार्थ बोलावून “जानकारी वाली अदालत” भरविला जाते. त्यामध्ये विद्यार्थी शासनाच्या त्या विभागातील विविध योजना, त्याचे काम कसे चालते आणि कोणत्या पद्धतीने केल्या जाते याची सविस्तर माहिती संबंधित अधिकारी यांना विचारतात.आणि ते मनमुक्तपणाने त्याची उत्तरे देतात.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची, ती समजून घेण्याची आवड निर्माण होते, आणि एक धाडस निर्माण होतो असे संस्थेचे संचालक सलमान खान यांचे मते आहे. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सेंट्रल बँकेचे शाखा अधिकारी प्रवीण खरात साहेब उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुलभाताई रमेशराव दुतोंडे, प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीर उल्ला खान पठाण, माजी सरपंच वैशालीताई गणेशराव वानखडे, मोहम्मद यासीन, अरुणजी रहाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रुबिनाज यांनी केले, प्रास्ताविक मुदस्सीरखान यांनी केले.

त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.