स्थानिक: अकोला येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय देगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व संविधान प्रस्तविकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी क्षीरसागर अंभोरे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुष्पगुच्छ अर्पण करून पूजन करण्यात आले. अजय अंभोरे यांनी प्रास्ताविक मांडले. तद्नंतर नागसेन अंभोरे यांनी संविधान राज्यघटनेचा मसुदा व स्वातंत्र्य समता-बंधुता यावर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनिकेत जंजाळ, नागेश सुरवाडे, अजय सुरवाडे, तथागत अंभोरे,गौरव इंगळे, गजानन तराळे, आकाश इंगळे, सौरव इंगळे, करण अंभोरे, सूरज अंभोरे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप तायडे, सुरेश इंगळे, आदित्य अंभोरेगौतम अंभोरे सह आदी गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. संचलन नागसेन अंभोरे यांनी केले तर आभार खुशी तायडे हिने मानले.