आज दिनांक २६/०१/२०२४ रोजी शास्त्री स्टेडीयम येथे प्रजासत्ताक दिनाचे निमीत्ताने अकोला पोलीसांच्या, मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त ३२ मोटार सायकल वाहनांचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आले.
अकोला शहरांमध्ये आठ पोलीस स्टेशनचा समावेश असून शहराची लोकसंख्या अंदाजे १० लाख इतकी आहे. अकोला शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि पोलीसांची कार्यक्षमता आणि तत्परता वाढवण्यासाठी सदर वाहनांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत मिळालेल्या दुचाकी वाहनांना सायरन रेडियम आणि पोलिसांचे शस्त्र ठेवण्याच्या सोयीसह सुसज्ज आहेत, यापैकी रोज १६ मोटरसायकल शहरात संध्याकाळी सहा ते अकरा पर्यंत नेमून दिलेल्या पॉईंट नुसार पेट्रोलिंग करणार आहेत तसेच पोलीस मुख्यालयातून अधिक पाच लाईट व्हॅन ह्या फिक्स पॉइंट वर सतर्क राहून त्यामध्ये चार ते पाच अंमलदार हे कर्तव्य बजावतील त्यासोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर शाखांमधील प्रत्येकी पाच कर्मचारी हे संध्याकाळी सात ते आठ दरम्यान पायी पेट्रोलिंग करणे बाबत आदेश दिले आहेत.. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनला डायल ११२ चे स्वतंत्र वाहन देखील उपलब्ध असून कोणत्याही अनुचित प्रसंगी सदर नंबर वर संपर्क केल्यास त्वरित प्रतिसाद दिल्या जातो. शहरातील राबवल्या जाणा-या सर्व गस्त व पेट्रोलिंग वाहनांवर अपर पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे नियंत्रण ठेवल्या जाणार आहे.
वरील सर्व प्रकारच्या पेट्रोलिंग दरम्यान शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणे शाळा, कॉलेजेस, बँका, ट्युशन क्लासेस, धार्मिक स्थळे, मॉर्निंग वॉकचे ठिकाणे, बगीचा, स्टेडियम, एटीएम, इत्यादी ठिकाण समाविष्ट होतील याची दक्षता घेण्यात येणार आहे..
अकोला जिल्हा पोलीस दलामध्ये नव्याने Hero तसचे TVS कंपनिच्या अशा एकूण ३२ वाहने मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. त्याचा प्रभावी व जलद पेट्रोलींग कामी तसेच नागरीकांना जलद प्रतिसाद देण्यास मदत होणार आहे. सदर वाहनांचा वापर शहर तसेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी तसेच गुन्हेगारीला आळा बसविणे कामी मदत होणार आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या अभिनव संकल्पनेतुन सदर वाहनांवर अत्याधुनिक सामग्री बसविण्यात आली आहेत.