शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्याचे उद्घाटन..

समृद्ध पुस्तक संस्कृतीतून आयुष्य समृद्ध करूया – डॉ. जगदीश कुलकर्णी नांदेड

-अकोला :- स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, भाषा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना  व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत दि.१ ते १५ जानेवारी २०२५ वाचन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. या कार्यक्रमातर्गत सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शनी, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक समीक्षा, साहित्यिक आपल्या भेटीला, कहाणी वाचन प्रतियोगिता, वाचन संवाद, कथा-कथन स्पर्धा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुस्तक प्रदर्शनीचे उद्घाटक डॉ. जगदीश कुलकर्णी संचालक ज्ञान श्रोत केंद्र स्वामि रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड हे होते तर सामूहिक वाचन या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सागर खाताडे, ग्रंथपाल, सोमय्या विद्याविहार मुंबई हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे हे होते. प्रमुख उपस्थिती डॉ. आशिष राऊत, समन्वयक, तथा डॉ. संजय पोहरे, डॉ. पी. पी. देशमुख, डॉ. संजय तिडके, डॉ. नितीन मोहोड, प्रा. गोविंद काळे, प्रा. श्रीकृष्ण तराळे, प्रा. सुनीलकुमार मावस्कर हे उपस्थित होते. तर सामूहिक वाचनाला सदिच्छा भेट म्हणून डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अकोला , डॉ. वर्षा चिखले अमरावती. डॉ. किरण खंडारे, प्राचार्य डॉ. एच एन सिन्हा महाविद्यालय, पातूर यांनी दिली वी मार्गदर्शन केले. आपल्या उद्घाटकीय भाषणात डॉ. कुलकर्णी म्हणाले – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे कारण मराठी साहित्य विपुल व समृद्ध आहे. आज अनेक अडचणीचे समाधान वाचन  संस्कृतीत आहे. समृद्ध पुस्तक संस्कृतीतून आयुष्य समृद्ध करूया असे आवाहन विद्यार्थ्यंना केले.

अध्यक्ष भाषणात डॉ. रामेश्वर भिसे यांनी वाचनासाठी महाविद्यालायात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आशिष राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय पोहरे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. थोरात, प्रा.मडसने, प्रा. खेकाळे, प्रा. बढे, मिलिंद इंगळे, राजभोज यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.