श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन

स्थानिक /अकोला. श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला चे ग्राम सोनाळा येथे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर ग्राम सोनाला येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अंबादास कुलट हे होते तर उदघाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे रासेयो समिती सचिव प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजय खड्डकार विभागीय संचालक य.च मु वि.अमरावती विभाग, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉ अविनाश बोर्डे सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गावचे सरपंच श्री महानाम फुलके,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संजय तिडके,केंद्रप्रमुख डॉ आनंदा काळे,मारोती संस्थान अध्यक्ष श्री गोवर्धन होनाळे, कार्यकारी अधिकारी प्रा सचिन भुतेकर, प्रा कांचन कुंभलकर,महेश फलके,प्रा डॉ वैशाली ठाकरे,विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले, वैष्णवी आसेकर मंचावर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सचिन भूतेकर यांनी केले संचालन आदित्य टोले यांनी तर आभार प्रदर्शन रोहन बुंदेले यांनी केले. या शिबीर दरम्यान श्रमदानातून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी करणार आहे.तसेच गावकरी व विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, जिल्हा स्त्री रुग्णालय तर्फे आरोग्य शिबीर,ह्रदयरोग प्राथमिक उपचार प्रात्यक्षिक कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास सांस्कृतिक कार्यक्रम गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित कीर्तन असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सात दिवसा मध्ये राबविण्यात येणार आहे. शिबिरासाठी गटप्रमुख सतिष अस्वार,अक्षय वानखडे, गणेश जाधव, मयुरी राठोड तेजस्वीनी राठोड, प्रज्वल ईसाळ हे अथक परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.