श्री शिवाजी महाविद्यालयातील अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन व अतिथी व्याख्यानाचे आयोजन

स्थानिक/ अकोला. श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला येथील अर्थशास्त्र विभागाद्वारे अतिथी व्याख्यान व अर्थशास्त्र मंडळाचे कार्यक्रम संपन्न. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले संगीत विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख,प्रमूख वक्ते म्हणुन उपस्थित असलेले डॉ प्रदीप ताकतोडे अर्थशास्त्र विभाग प्रमुख कला महाविद्यालय मलकापूर, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ.प्राजक्ता पोहरे, डॉ.धनंजय अमरावतीकर ,प्रा. सचिन पवार ,प्रा. पुरुषोत्तम सोनवणे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले उपस्थित होते.सोबतच अर्थशास्त्र विभागाचे नावलौकिक केल्याबद्दल रोहन बुंदेले यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रदीप ताकतोडे यांनी अर्थसंकल्प व राज्य शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती दिली ,पर्यावरण पूरक विकास, स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर देशमुख यांनी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व अर्थशास्त्र बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्राजक्ता पोहरे यांनी केले.संचालन प्रा.सचिन पवार,तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले यांनी केले कार्यक्रमाला अर्थशास्त्र मंडळाचे उपाध्यक्ष सायली गजबिये,सचिव आकाश इंगळे, सदस्य वैष्णवी राठोड, जया दांडगे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.