
स्थानिक: अकोला येथे YIN च्या निवडणूक मध्ये श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये कला शाखेतुन अध्यक्षपदी वैभव आयवले , उपाध्यक्ष, अविराज अडाखे, विज्ञान शाखेतून,अध्यक्ष.अंकिता ठाकरे , उपाध्यक्ष.यशवंत वर्मा, या सर्व युवा उमेदवार निवडून आल्याबद्दल श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे सर, डॉ. संजय पोहरे सर, डॉ. नाना वानखडे सर, डॉ. आनंदा काळे सर, प्रा. संजय काळे सर, डॉ. सुनील मावसकर सर,डॉ. संतोष पस्तापुरे सर, पवनदादा महल्ले, यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दै.सकाळ चा YIN या विद्यार्थी संसद २०२५-२६ यावर्षीच्या निवडणुकीचा श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे घेण्यात आल्या होत्या आणि या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. या महाविद्यालयामध्ये उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहे. निवडणुकीमध्ये निवडून आलेले वैभव आयवले (अध्यक्ष) कला शाखा अविराज अडाखे (उपाध्यक्ष) कला शाखा अंकिता ठाकरे ( अध्यक्ष) विज्ञान शाखा यशवंत वर्मा ( उपाध्यक्ष) विज्ञान शाखा सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे सत्कार करण्यात आला, शुभम येसणकर, जय नुपनारायण, सिद्धार्थ ओवे, साबीर, सोना गवारगुरू, पायल वानखडे, आणि सर्व मित्र परिवार इत्यादी मंडळींनी निवडणूक यशस्वी पार पाडण्यास सहकार्य केले.
प्रतिनिधी : शुभम गोळे