हकीकत अशाप्रकारे आहे की सन २००० साली अकोला व वाशिम जिल्हयातील सर्वसामान्य नागरीकांना रेशनकार्डवर वितरीत करण्यात येणारा ४५ लाख ७३ हजार २२६ रूपये किंमतीचा ४८ ट्रक गहु मालेगाव, मंगरूळपीर, रिसोर्ड आणि वाशिम येथे न पोहचल्याने, रेशनचा गहु गायब झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याप्रकरणात पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे एकुण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात मुख्य आरोपी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणुन रामदयाल गुप्ता यांचेसह ट्रकचे ड्रायव्हर तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी, पुरवठा अधिकारी तसेच इतर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना मुक्ष्य आरोपीने गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करून सदरचा रेशन घोटाळा केला होता. सदर प्रकरणात दि.२९/०२/२०२४ रोजी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांचे कोर्टानी २४ वर्षानंतर निकाल दिला असुन सदर निकालामध्ये मुख्य आरोपी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता यांना कलम ४०७ अन्वये ०५ वर्ष शिक्षा व ४० हजार दंड, कलम ४२० अन्वये ०५ वर्ष शिक्षा १५ हजार देड, ४६८ अन्वये ०३ वर्ष शिक्षा व १० हजार दंड, कलम २०१ अन्वये ०२ वर्ष शिक्षा व दोन हजार दंड तसेच सातही सरकारी अधिकारी कर्मचा-यांना ०२ वर्ष शिक्षा ठोठाविण्यात आली असुन यामध्ये जवळपास ४१ साक्षीदार तपासण्यात आले होते, तसेच ट्रकचे चालकांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस स्टेशन अकोट फाईल ठाणेदार पो.नि.शेख सुलतान यांनी केला असुन सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील दीपक काटे आणि विद्या सोनटक्के यांना काम पाहले. पैरवी अधिकारी म्हणुन राजेंद्र पाटिल सी.एम. एस. सेल व पो. हवा. अनिल धनबर पो.स्टे. अकोट फाईल यांनी काम पाहले.
प्रसिध्द रेशन धान्य घोटाळा प्रकरणाचा निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी एका वरीष्ठ अधिका-यासह ०३ जणांना सुनावली शिक्षा. ०६