अकोला पोलीस दलामध्ये २८५ पोलीस अंमलदार यशस्वी मुलभुत प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू पोलीस अधीक्षक यांनी नवप्रशिक्षित अंमलदार यांचे स्वागत व सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

दिनांक १६.०२.२०२४ रोजी पोलीस मुख्यालय अकोला येथे सकाळी ०७ वा. नवप्रविष्ठ २८५ पोलीस अंमलदार अकोला पोलीस दलात रुजू झाल्याने त्याचे मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिहं यांचे शुभहस्ते स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलीस अधीक्षक बाळापूर विभाग श्री. गोकुळ राज जी. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. सतीश कुळकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांना मानवंदना दिली, त्या नंतर आपल्या शिस्तबद्धतेचे प्रदर्शन पथसंचलना द्वारे केले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक यांनी नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शक मत व्यक्त करतांना, पोलीस म्हणून काम करतांना आपल्या कर्तव्याच्या प्रति प्रामाणिक राहून समजामध्ये आपली एक आदर्श प्रतिमा जनतेसमोर तयार करावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. अकोला पोलीस दलामध्ये पोलीस अंमलदारांची संख्या ही कमी होती त्यामुळे मोठा ताण पोलीस विभागतील इतर अंमलदार यांच्यावर होता परंतु नवप्रविष्ट २८५ पोलीस अंमलदार अकोला पोलीस दलात यशस्वी रित्या प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत. त्यामध्ये ९२ महिला पोलीस अंमलदार व १९३ पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. नवीन पोलीस अंमलदार यांना पोलीस स्टेशन मध्ये बदली करून विशेष भेट देण्यात येत आहे, त्यामुळे पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस अंमलदार यांचा ड्युटी चा बराच ताण कमी होईल असा आशावाद पोलीस अधीक्षक, यांनी व्यक्त केला व सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षण कालावधी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार अनुप धोटे ब.न. १५६, आंतरवर्ग, बाह्यवर्ग व्दितीय व मनोज राईद ब.न. ७७ आंतरवर्ग बाह्यवर्ग तृतीय क्रमांक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे

मिळविल्या बद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र. पोलीस उपअधीक्षक श्री विजय नाफडे, राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके, व टीम यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.