श्री समर्थ पब्लिक स्कुल मध्ये पालकांकडून करून घेण्यात येत आहे जबरदस्ती बिजेपी पार्टीचा प्रचार

संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी

स्थानीक: अकोला कार्यक्षेत्रा अंतर्गत येणा-या श्री समर्थ पब्लिक स्कुल, शेगाव रोड, अकोला येथे शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून सक्तीने भारतीय जनता पक्षाचा (BJP) प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने सरल अॅप (Saral App) पालकांना फोनवर सुचना देवून सरल अॅप (Saral App) डाउनलोड करण्यास सांगत असून त्या माध्यमाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्यत्य सभासद नोंदणी करण्याचे अभियान राबवित आहेत. अशाप्रकारच्या तोंडी व लेखी तक्रारी आमच्या संघटनेकडे प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने आम्ही आपल्या निदर्शनास आणून देतो की, सदर शाळेमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी शिक्षण घेण्याच्या पवित्र उद्देशाने प्रवेश घेत असून निःपक्षपातीपणे संस्थेकडून शिक्षण देणे गरजेचे आहे.

परंतु राजकीय हव्यासापोटी सदर शाळेकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून शिक्षणाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचे (BJP) सभासदत्व घेण्यास भाग पाडणे हा भारतीय राज्य घटनेतील मुलभूत अधिकाराचा भंग आहे. त्यामुळे पालकांचे मुलभूत अधिकार धोक्यात येवून सदर शाळेचे नियमबाह्य कृत्य आहे. तसेच खाजगी व्यवस्थापन शाळा समिती अधिनियम व व्यवस्थापन या नियमानुसार सदर शाळेची मान्यता रद्द होणे गरजेचे आहे. सदर प्रकरणाची उचित चौकशी करून सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करावी. अशी मागणी फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.

Leave a Reply

Your email address will not be published.