आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांचा सुचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी अकोला जिल्हयातील वेगवेगळया पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या विना परवाना देशी व गावठी हातभट्टीची दारू विकणा-या व त्यांची वाहतुक करणारे आरोपीतांविरूध्द स्था.गु. शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्यांचेकडुन देशी दारू च्या ०४ केसेस करून ०५ आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन एकुण देशी दारूचा ३९,७८०/ रू चा मुद्देमाल व ०४ मो.सा. कि.अं. २,३०,०००/ रु च्या जप्त करण्यात आल्या.
तसेच गावठी हातभट्टीच्या दारू व सडवा मोहमाच ची ०१ केस करून ०२ आरोपीतांकडुन एकुण ८१,४००/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असा एकुण आज पावेतो एकुण ३,४५,१८०/ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला,
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. राजेश जवरे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.