वार्ड क्रं 1 वर महानगर पालिकेची कारवाई..
स्थानिक:
अकोला येथील नायगाव डम्पिंग ग्राउंड वार्ड क्रमांक एक झोपडपट्टी या ठिकाणी महानगरपालिकेने कारवाई करत डंपिंग ग्राउंड ला लागून असणारे अतिक्रमण हटवण्यात आले.
शहराची सुरुवात ही वार्ड क्रमांक एक म्हणजे नायगाव पासून होते. अकोल्यातील सर्व कचरा या भागात टाकण्यात येत असून आजूबाजूला असणाऱ्या परिसराला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. डंपिंग हे शहरापासून लांब असायला पाहिजे जेणेकरून नागरिकांच्या आयोग्यवर त्याचा परिणाम होणार नाही. पण येथे सर्व विपरीत घडतानी दिसत आहे.
महानगर पालिकेचे आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशानुसार डंपिंगच्या विकासासाठी नायगाव येथे अतिक्रमण मध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावली होती. पण त्यावर नागरिकांनी कोणतीही अमलबजावनी न केल्याने आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून त्यावर कारवाई करत डंपिंग ग्राउंड ला लागून जे घरं जवळपास १० – १२ वर्षापासून बांधण्यात आले होते त्यासर्व घरांवर बुलडोझर चालविण्यात आले.
नागरिक देखील आपल्या घराचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः हून घर खोलत सामान बाहेर काढतांना दिसले.
तेव्हा परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आम्ही राहणार तरी कुठे? याचा मोबदला आम्हाला मिळेल काय? दुसऱ्या ठिकाणी आमचे स्थलांतर महानगर पालिका करेल काय? असे प्रश्न उपस्थित केले.