
• अकोला : हृषीकेश ठाकरे हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने परीक्षेत २२४ वा रँक मिळविला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील मॅकेनिकल इंजिनीअरिंगचा तो पदवीधर आहे. दोन वर्षे दिल्ली येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची
तयारी त्याने केली होती. आयएएस कॅडरला हृषीकेशची निवड होणार आहे. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण, परवडणारे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, शिक्षणातून समाजातील साक्षरता वाढीसोबतच समाज आणि आर्थिक स्तर उंचवावा व सर्वांना आरोग्य सुविधा सुलभतेने मिळाव्या, असे मत हृषीकेशने व्यक्त केले. त्याचे वडील आरोग्य विभागातून निवृत्त झाले आहे. हृषीकेशच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.