
रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचा लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला अनंत व्याधींनी थकलेल्या,खंगलेल्या, मनोबल हरविलेल्या पिडीत रूग्णांना औषधांच्या उपचारांसोबतच मानसिक आधाराचा रामबाण उपाय म्हणजे रोगांवर विजय मिळविण्याच्या आशा प्रबळ करणारा सुखद आनंद असतो.समाजातील वंचित,निराधार,विकलांग घटकांना आधार देण्यासोबतच रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा या मानवता धर्मातील कल्याणकारी सत्त्याचा अनेक महापूरूष आणि संतांनी उद्घोष केलेला आहे.या मानवी जीवनमुल्ल्यांचा अंगीकार करून गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा सामान्य रूग्णालय आणि इतरत्र आजारांनी ग्रस्त रूग्णांची यथार्थ सेवा करीत एका कृतार्थ सेवाव्रती म्हणून मानवता धर्माचे पालन करीत आहात.या सामाजिक साधनेबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून गौरव करण्यात येत असून आपले हार्दिक अभिनंदन….!
आपण १५ वर्षाच्या रूग्णसेवा काळात २७ वेळा रक्तदान करणारे सेवाभावी रक्तदाते आहात.या अविरत सेवा साधनेतून आपण आतापर्यंत ४-५ अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्याचे उदात्त मानवतावादी कार्य केलेले आहे.आरोग्य आणि रक्तदान शिबीरांच्या आयोजनासोबतच रूग्णसेवा,रहदारी,कोरोना निवारणात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून सामाजिक सेवा आणि सद्भावना बाळगणारांना आपण प्रोत्साहीत केले आहे.सामाजिक विकास आणि सुलभ सेवा अभियान वृध्दींगत करण्याचे मोलाचे आपण कार्य करीत आहात. या आपल्या सेवा ,सद्भावना नव्या मानवतावादी कार्याचा आलेख असाच उंचावत जावो यासाठी आपल्या रूग्णसेवेच्या आणि विविधांगी निरंतर सेवाभावी वाटचालीला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून मन:स्वी हार्दिक शुभेच्छा…!! यावेळी (इलना) इंडीयन लॅग्वेजस न्युज पेपर दिल्ली चे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश भाऊ पोहरे लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, विनोदी सुप्रसिद्ध कवी अनंतराव खेडकर यांच्या हस्ते रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ नेते राजा भाऊ देशमुख, साप्ताहिक दिव्य विदर्भ चे संपादक मनोहर मोहोड सर,प्रा संतोष हुशे सर,व लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते